esakal | मतदारांना वाटलेल्या पैशांची वसुली, पारनेरमध्ये पराभूत उमेदवारांकडून दमदाटी
sakal

बोलून बातमी शोधा

In Parner, the money allotted to the voters is being recovered

तालुक्यात अनेक गावात अटीतटीच्या निवडणुका झाल्या आहेत. अनेक गावात विविध मंडळांना काठावर बहुमत मिळाले आहे. तर अनेक ठिकाणी सत्ताधारी गटाला पराभवास सामोरे जावे लागल आहे.

मतदारांना वाटलेल्या पैशांची वसुली, पारनेरमध्ये पराभूत उमेदवारांकडून दमदाटी

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यापैकी नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. मात्र ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्यातील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप झाल्याची चर्चा आता तालुक्यात रंगू लागली आहे. मात्र काही गावात आता पराभूत उमेद्वाराकडून वसुली व दमबाजाही सुरू झाली आहे. त्यामुळे पैसे घेणाऱ्यांचे धाबे दणाणले असून मत देऊनही मतदारांना पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.

तालुक्यात अनेक गावात अटीतटीच्या निवडणुका झाल्या आहेत. अनेक गावात विविध मंडळांना काठावर बहुमत मिळाले आहे. तर अनेक ठिकाणी सत्ताधारी गटाला पराभवास सामोरे जावे लागल आहे. मात्र आता पराभूत उमेद्वाराने हद्दच केली आहे. एका गावातील पराभूत उमेद्वाराने आता दमबाजी बरोबरच दिलेले पैसे वसुली करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे ज्यांनी पैसे घेतले ते अडचणीत सापडले आहेत. कारण एकतर पैसे घेणे हाच गुन्हा आहे. मात्र बळजबरीने पैसे गोरगरिबांना दिले. त्या गोरगरिबांनी आता ते खर्चही केले आहेत. आता पुन्हा त्यांना ते पैसे कोठून द्यावयाचे, अशा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहीला आहे.
    
सोशल मिडीयावरही जोरदार वसुलीच्या चर्चा व प्रतिक्रीयाही व्यक्त केल्या आहेत. मतदार राजावर मेहरबानी केल्यासारख पैसे देऊन मत विकत घेण्याचा उमेद्वारांनी जो प्रयत्न केला त्याची वसुली सुरु झाली आहे. गोरगरीब जनतेला दडपणाखाली घेऊन बळजबरीने पैसे देऊ केले, मतदान पार पडले ज्या उमेदवारांचे पैसे वाटले त्याच्या हस्तकाने त्याचे उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले. म्हणून वाटलेले पैसे गोळा करायला सुरुवात केली आहे. नुसती सुरवातच नाही तर दमदाटी करून पैसे गोळा करण्याचे काम सध्या जोरात सुरु आहे. पण प्रश्न हा आहे की ते मतदार तुमच्याकडे पैसे मागायला आले नव्हते, तर तुम्ही त्यांच्या दारात पैसे देऊन मताची भीक मागायला गेले होता ही गोष्ट लक्षात घ्यावी. निवडणुका दर पाच वर्षांनी येणार आहे, त्यामुळे असे करणाऱ्यांना मतदार पुन्हा दारात उभे करणार नाहीत, अशा प्रतिक्रीया आता सोशल मिडीयावर उमटू लागल्या आहेत.

loading image
go to top