esakal | पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत ‘पाणी पेटणार’
sakal

बोलून बातमी शोधा

Parner Nagar Panchayat elections will be held on water issue

पारनेर नगरपंचायतीची मुदत या महिन्यात संपत आहे. नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर पाच वर्षातही शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला नाही.

पारनेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत ‘पाणी पेटणार’

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : पारनेर नगरपंचायतीची मुदत या महिन्यात संपत आहे. नगरपंचायतीच्या स्थापनेनंतर पाच वर्षातही शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला नाही. त्यामुळे या निवडणुकित सर्वाधिक कळीचा व प्रचाराचा मुद्दा पाणी हाच असणार आहे. मात्र, विद्यामान जवळजवळ सर्वच सदस्य सत्ताचे मांडवाखालून गेल्याने अता नेमका पाणी प्रश्न कोणी सोडविला नाही हा संशोधनाचा विषय ठरणार आहे. मात्र येऊ घातलेली निवडणुक पाणी प्रश्नावरच गाजणार आहे हे मात्र निश्चित आहे. 

पारनेर शहराला हंगे तलावातून पाणी पुरवठा केला जातो. हंगे तलावातून भरपूर पाणी असूनही छोटी जलवाहिणी व अपुरी जलकुंभाची साठवण क्षमता या मुळे आजही शहराला तीन ते चार दिवसानंतर पाणी पुरवठा केला जातो. तलावात पाणी आहे शहरासाठी सुमारे साडे आठ लाख लिटर पाणी साठवण क्षमता असणारे पाण्याचे जलकुंभ आहेत. वाड्यावसत्यांसाठी वेवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पाणी योजणा आहेत. 

शहरात सुमारे 15 हजार लोकसंख्या आहे . मात्र शहरासाठी हंगे तलावातून जी जलवाहिणी सध्या अस्तीत्वात आहे ती छोटी असल्याने शहराला पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. तलावातून पाणी शहरापर्यंत येणे व ते आल्या नंतर जलकुंभ भरणे व त्या नंतर ते पाणी विततरीत करणे यासाठी लागारा वेळ खूप मोठा असल्याने शहराला तीन ते चार दिवसांनतर पाणी पुरवठा गेला जातो. तर काही प्रभागातील जलवाहिण्या खराब झाल्याने तेथे पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.

शहराला दररोज नाही तर किमान दिवसआड पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र तसे करावयाचे असेल तर सध्या असलेल्या जलवाहिणीत बदल करूण किंवा स्वतंत्र जलवाहिणी टाकून पाणी आणावे लागणार आहे. तरच दिवसाआड पाणी पुरवठा करता येणार आहे.

सध्याच्या जलवाहिनीची मुदत 2007 मध्येच संपली आहे. त्यामुळे नविन योजणेस सहज मान्यताही मिळणार आहे.त्यासाठी स्वतंत्र जलवाहिणी टाकणे व गावातील वितरिकाही नविन टाकणे गरजेचे आहे. मात्र अता हे नव्याने येणा-या सत्ताधा-यांकडूनच ही अपेक्षा शहरातील नागरीकांना करावी लागणार आहे. मात्र हंगा तलावातूनही पाऊस कमी झाला तर शहराला पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे त्यामुळे शहरासाठी कायमस्वरूपी पाणी योजणा भविष्यात राबवावी लागणार आहे.

आम्ही प्राभाग नऊ मध्ये रहातो गेली अनेक वर्षापासून आम्हाला पाणी येत नाही. मात्र पाणी पट्टी नियमित येतेव आम्ही ती भरतो सुद्धा आम्ही अनेक वेळा निवेदन व मागणी करूणही आम्हाला पाणी पुरवठा केला जात नाही. आमच्या प्रभागातील जलवाहिणी मंजूर आहे मात्र तिचे काम जाणिवपुर्वक करणे टाळले जात आहे. त्यासाठी लवकरच उपोषण करणार आहोत, असे समिर आंबे यांनी सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image