Bakri Eid 2023: जातीय सलोख्याचा पारनेर पॅटर्न महाराष्ट्रभर! बकरी ईदला कुर्बानी न देण्याचा मुस्लीम बांधवांचा निर्णय

Parner Bakri Eid 2023 Celebration
Parner Bakri Eid 2023 Celebrationesakal

टाकळी ढोकेश्वर : पुरोगामी तालुका म्हणून व थोर क्रांतिकारक सेनापती बापट, जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यामुळे पारनेर तालुक्याचे नाव नेहमी पुढे असते. पारनेर तालुक्याने नागरिकांना माहितीचा अधिकार दिला.

राज्य, केंद्रीय पातळीवरील अनेक आंदोलानची निर्मिती येथुनच झाली. आताही सर्वप्रथम पारनेर तालुक्यातील मुस्लीम बांधवांनी आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद आली असल्याने पशुहात्या न करण्याचा निर्णय घेतला होता.

Parner Bakri Eid 2023 Celebration
CM Shinde in Jalgaon : शिंदे-फडणवीसांना खडसेंची धास्ती? काळे झेंडे दाखवण्याआधीच रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात

हाच निर्णय अहमदनगर जिल्ह्यासह बीड, धुळे या गावांमधील मुस्लिम बांधव घेत आहे. हा जातीय सलोख्याचा 'पारनेर पॅटर्न' महाराष्ट्रभर लागु होत असल्याचे पुढे आले आहे.

याबाबत माहीती अशी की, हिंदु मुस्लिम समाजात समन्वय व एकता कायम राहण्यासाठी पारनेर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व जेष्ठ व्याख्याते डाॅ.रफिक सय्यद यांनी तालुक्यात सद्भावना अभियानांतर्गत गावोगाव मशिद मध्ये सर्वधर्मीय नागरिकांच्या बैठका घेऊन लोकप्रबोधन सुरू केले यामध्ये सोशल नेटवर्किंग साईटवर होणारे विविध घडामोडी, जातीय सलोखा कायम राहण्यासाठी गावातील पदधिकारी व नागरिक यांनी कसे प्रयत्न करणे आवश्यक याबाबत सुचना देण्यात आल्या यामध्ये निघोज येथील शांताता कमिटी बैठकीत डॉ. सय्यद यांनी आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत.

ईदच्या चंद्र- दर्शना प्रसंगी मुस्लिम बांधव समस्त मानवजातीला अमन सलामती अर्थात सुख शांतीसाठी अल्लाहकडे दुवा मागतात म्हणून मुस्लिमांनी हिंदु भावडांच्या भावनांचा आदर करत आषाढी एकादशीच्या दिवशी कुरबानी न करण्याचे आवाहन डाॅ.सय्यद यांनी केले.

त्याला समस्त उपस्थितांनी सहमती दर्शवत पशुहात्या न करण्याचा निर्णय १८ जुन रोजी निघोज येथील बैठकीत घेतला त्यानंतर टाकळी ढोकेश्वर सह तालुक्यातील इतर गावांमध्ये पशुहात्या न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Parner Bakri Eid 2023 Celebration
Devendra Fadnavis : ''जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ आली नसती'' फडणवीस बरसले

ही भुमिका वृत्तपत्रातुन तसेच सोशल मीडिया मधून राज्यभर पोहचली. धुळे येथील जिल्ह्यातील शांतता समिती बैठकीत पारनेर येथील बैठकीचा उल्लेख करत हा निर्णय धुळे जिल्ह्य़ात घेण्यात यावा अशी मागणी पुढे आली. बीड जिल्ह्यातील कुरेशी समाजाने एकादशी दिवशी पशुहत्या न करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील शेवगाव, जामखेड, कोपरगाव या तालुक्यातील मुस्लिम बांधवानी तो घेतलाही. यामुळे जातीय सलोख्याचा पारनेर पॅटर्न हा महाराष्ट्राने स्विकारला आसे म्हणले तर वावगे ठरणार नाही.

अनगडशहा फकीर बाबांच्या दर्ग्यावर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीची पहिली आरती होते. हिंदु मुस्लिम ऐक्याची पंरपरा गंगा-जमना तहजीब म्हणुन पुढे वाहती आहे.आमच्या अनेक पिढ्या एकमेकांच्या सणोउत्साहात सहभागी झालेल्या असुन सद्भाभावना यातुन पुढे आली आहे. तालुक्याचा हा निर्णय राज्यभर घेण्यात येत असल्याचे आदर्शवत व सामाजिक ऐक्याचे उदाहरण आहे वारी नेहमी समतेची व मानवतेची दिंडी ठरली आहे मुस्लिम बांधवानी घेतलेला हा निर्णय जातीय सलोख्येला बळ देणारा ठरणार आहे -

- डॉ. रफीक सय्यद, जेष्ठ व्याख्याते

आम्ही तालुक्यातील जातीय सलोखा कायम राहावा या करीता गावोगाव सद्भावना अभियानांतर्गत सर्वधर्मीय नागरिकांच्या बैठका घेतल्या व घेत आहोत. यामध्ये आषाढी एकादशी दिवशीच बकरी ईद आल्याने पशुहात्या या दिवशी करायची नाही ही संकल्पना मुस्लिम बांधवाकडुन आली. तालुक्यातील गावांमध्ये ती लागू होत असताना ही बातमी सर्वत्र गेली. आज राज्यभरात हा निर्णय गावोगाव घेण्यात येत असल्याने आम्ही सुरू केलेल्या सद्भावना अभियानाचे समाधान वाटते.

- संभाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक, पारनेर पोलीस स्टेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com