
MP Nilesh Lanke Secures ₹58 Crore Compensation for Flood-Hit Parner Farmers.
Sakal
पारनेर : सप्टेंबर महिन्यातील मुसळधार पावसाने पारनेर तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले. पिके उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळाला असून, 71,783 शेतकऱ्यांसाठी 58 कोटी 49 लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. खासदार नीलेश लंके यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.