याबाबत बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे, माजी अध्यक्ष अर्जुन चौधरी यांच्यासह 13 जणांविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत पुरुषोत्तम शहाणे (रा. सुपे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
पारनेर ः कर्जाची परतफेड करूनही पारनेर सैनिक सहकारी बॅंकेने कर्जदाराकडे रक्कम थकीत दाखवून त्याच्या मालमत्तेचा बेकायदा लिलाव केला.
याबाबत बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे, माजी अध्यक्ष अर्जुन चौधरी यांच्यासह 13 जणांविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत पुरुषोत्तम शहाणे (रा. सुपे) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
फिर्यादी पुरुषोत्तम शहाणे यांचा बंधू राजेंद्र शहाणे यांनी सैनिक सहकारी बॅंकेकडून व्यवसायासाठी 6 लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड केल्यावरही बॅंकेने शहाणे यांच्या तारण मालमत्तेचा लिलाव केला.
याबाबत बॅंकेचे अध्यक्ष व्यवहारे, माजी अध्यक्ष चौधरी यांच्यासह तत्कालिन तलाठी करपे, मंडलाधिकारी दाते (पूर्ण नाव समजले नाही), बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे, वसुली अधिकारी प्रवीण निघोट, व्यवस्थापक आप्पासाहेब थोरात, अनिल मापारी, दत्तात्रेय भुजबळ, रमेश मासाळ, भरत पाचारणे, अरुण आवारी व संतोष भनगडे यांच्याविरुद्ध पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संपादन - अशोक निंबाळकर