
पारनेर : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने बारदाना उपलब्ध झाल्याने आता बुधवार (ता. २२) पासून ज्या शेतकऱ्यांनी मुदतीत सोयाबीन विक्रीची नोंद केली होती, त्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे आठशे शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले आहे. त्यांना सुमारे एक कोटी ९५ लाख ८६ हजार रुपये त्यांच्या खात्यावर वर्गही केले आहेत.