esakal | शिवसेनेचे नेते विजय औटी पुन्हा राजकारणात सक्रीय होणार
sakal

बोलून बातमी शोधा

Parner Shivsena leader Vijay Auti will be active in politics again

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर व कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी स्वात:च्या व सामाजाच्या हितासाठी काही काळ राजकारणात शांत झालो आहे. 

शिवसेनेचे नेते विजय औटी पुन्हा राजकारणात सक्रीय होणार

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर व कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी स्वात:च्या व सामाजाच्या हितासाठी काही काळ राजकारणात शांत झालो आहे. तालुक्यात जास्त फिरत नाही, याचा अर्थ मी राजकारण सोडून दिले असा होत नाही. या पुढेही मी राजकारणात सक्रीयच राहाणार आहे. माझ्या कार्यकर्त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. सध्या माझे राजकीय घडामोडीवर बारीक लक्ष असून कोण काय करतो व कोठे जातो याचा अभ्यास करत आहे, असे प्रतिपादन विधान सभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यानी केले.

पारनेर येथे शिवसेनेच्या वतीने सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ झाला. त्यावेळी औटी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष शशिकांत गाडे होते. याप्रसंगी जिल्हा परीषदेचे कृषी व बांधकम समितीचे सभापती काशिनाथ दाते, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास भोसले, तालुका प्रमुख विकास रोहकले, नगराध्यक्ष वर्षा नगरे, पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, नितीन शेळके, निलेश खोडदे, विजय डोळ, वर्षा पुजारी, शिरीष साळवे, संदीप मोढवे यांच्यासह मोठ्या संखेने कार्यकर्ते ऊपस्थीत होते. 

औटी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत पराभूत झालो म्हणजे मी आता पुन्हा राजकारणात येणार नाही. राजकारण सोडून देणार असा काहींचा गैरसमज झाला असेल तर तो चुकीचा आहे. यापुढील काळातही मी राजकारणात सक्रीयच राहाणार आहे. तालुक्यात आगामी काळात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसह पारनेर नगरपंचायत तसेच पंचायत समिती व जिल्हा परीषद निवडणुका सुद्धा आम्हीच जिंकाणार आहोत. आता हे सांगण्याची गरज नाही. आगामी काळात जनता व आमचे कार्यकर्ते हे दाखवून देणार आहेत. आजही दररोज माझ्या कार्यालयात अनेक कार्यकर्ते माझ्याकडे भेट घेण्यास येत आहे. आल्यावर ते आपल्या मनातील खंत व्यक्त करत आहेत.

सध्या कोरोनाचे संकट आहे. या संकटात पक्ष किंवा गटतट विसरून काम केले पाहीजे. आज आम्ही सदस्य नोंदणीला पारनेर शहरापासून सुरूवात केली आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्या नंतर मी कार्यकर्त्यांसह तालुकाभर दौरे करून जनतेशी संवाद साधणार आहे. आज कोरोनाच्या संकटामुळे ठराविक मोजक्या कार्यकर्त्यांना निमंत्रीत केले आहे. आमची संघटना आजही मजबूत आहे व या पुढेही राहाणार आहे.

जिल्हाध्यक्ष गाडे म्हणाले, तालुक्यात सुरू केलेल्या सभासद नोंदणीस चांगला प्रतिसाद मिळला आहे.  पुढेही तालुकाभर सभासद नंदणी करण्यात येणार आहे. शिवसेनेचे तालुक्यातील काम अतीशय चांगले आहे. पक्षाच्या वीतने सुरू करण्यात आलेले कोविड सेंटर तर अतीशय आदर्श आहे. या वेळी प्रास्ताविक व स्वागत जिल्हाउपाध्यक्ष भोसले यांनी तर अभार सभापती दाते यांनी मानले.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image