esakal | विजय औटी यांच्याकडून शिवसैनिकांवर अन्यायच; ‘तेव्हा’ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिली उमेदवारी
sakal

बोलून बातमी शोधा

Parner Shivsena workers lodge complaint against Vijay Aunty with Uddhav Thackeray

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी हे पक्षापेक्षा स्वतः चाच स्वार्थ पाहत असल्यामुळे आम्ही नगरसेवक त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहोत. आमचा पक्षावर काडीचाही राग नाही. औटी यांच्या हातुन पक्षाची सुत्रे काढुन निष्ठावान खंद्या शिवसैनिकाच्या हाती सुत्रे दिल्यास शिवसेनेस तालुक्यात पुन्हा सुवर्ण दिन येतील, अशी आम्हाला आशा आहे, अशी तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नगरसेवकांनी केली आहे.

विजय औटी यांच्याकडून शिवसैनिकांवर अन्यायच; ‘तेव्हा’ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिली उमेदवारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी हे पक्षापेक्षा स्वतः चाच स्वार्थ पाहत असल्यामुळे आम्ही नगरसेवक त्यांच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहोत. आमचा पक्षावर काडीचाही राग नाही. औटी यांच्या हातुन पक्षाची सुत्रे काढुन निष्ठावान खंद्या शिवसैनिकाच्या हाती सुत्रे दिल्यास शिवसेनेस तालुक्यात पुन्हा सुवर्ण दिन येतील, अशी आम्हाला आशा आहे, अशी तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नगरसेवकांनी केली आहे. ही पाचपानी 'तक्रार'च 'सकाळ'च्या हाती लागली आहे यामध्ये नगरसेवकांनी अगदी सुरवातीपासुन सर्व कैफियत ठाकरे यांच्यासमोर मांडली आहे.
त्यात म्हटलंयं की, औटी यांनी सातत्याने सामान्य शिवसैनिकावर अन्याय करून दुसऱ्या पक्षातील लोकांना पाठबळ दिले आहे. स्थानिक पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाला, काँग्रेस उमेदवारांना उमेदवाऱ्या दिल्या. शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडुन दिले. शिवसेननेच्या शाखा वाढविण्यासाठी त्यांनी कधीच प्रयत्न केले नाहीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कधीही उपक्रम राबविले नाहीत. पक्षाची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवड झाली तरी त्यांच्या अभिनंदनाचा साधा फलक देखील यांना लावला नाही. शिवसेना प्रमुखांच्या अस्थी तालुक्यात आल्या असता ते दर्शनालाही गेले नाहीत. अस्थींची मिरवणूक काढुन सत्ता मिळत नसते, अशी दर्पोक्ती करून सच्चा शिवसैनिकांना अपमानित केले. निलेश लंके यांचे पक्षासाठी योगदान असताना त्यांची चुकीच्या पद्धतीने हकालपट्टी करण्यात आली. त्याची किंमत पक्षाला विधानसभा निवडणूकीत भोगावी लागली. 
शिवसेनेच्या जिवावर 15 वर्षे आमदारकी, विधानसभेचे उपाध्यक्षपद देऊनही औटी यांनी नेहमीच पक्षविरोधी भुमिका घेतलेली आहे. विधानसभा निवडणुकीत तब्बल 60 हजार मतांनी पराभव झाल्याने औटी हे सक्रिय राजकारणात राहण्याची सुताराम शक्यता नाही. आता शिवसेनेच्या संघटनेचा उपयोग स्वतःच्या नातेवाईकांसाठी करण्यासाठी, अधिकाऱ्यांना दमबाजी करण्यासाठी करण्यात येत आहे. 
त्यामुळे त्यांची पक्षातुन हकालपट्टी करून निष्ठावान शिवसैनिकाकडे पक्षाची धुरा सोपवावी, अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही. आम्ही आमदार निलेश लंके यांच्याशी संपर्क केला असता विकासासाठी नगरविकास खात्यातुन हवा तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी अभिवचन दिले. औटी यांच्या नेतृत्वास कंटाळलो असुन आम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश द्या, अशी विनंती त्यांना केली आपले आघाडीचे सरकार असल्याने पक्ष प्रवेश करणे बरोबर नसल्याचे आमदार लंके यांनी सांगितले आघाडीतील पक्षाचे नगरसेवक म्हणुन मदत करण्याचे त्यांनी मान्य केले होते. औटी यांच्याकडुन मदत होत नसल्याने आम्हाला पक्षातुन बाहेर पडायचे आहे. राष्ट्रवादीने प्रवेश नाही दिला तर आम्ही भाजपमध्ये जाऊ, अशी भुमिका मांडल्यानंतर लंके यांनी अजित पवार यांच्याशी संपर्क साधला आम्हाला प्रवेश देणार नसाल तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश करतो, असे सांगितल्यानंतर पवार यांनी पक्ष प्रवेशास मान्यता दिली. यावरती नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने, उमाताई बोरूडे यांच्या स्वाक्षरी आहेत.

loading image