
पारनेर : तालुक्यात दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सध्या तालुक्यातील १९ गावांना पाण्याची टंचाई भासत आहे, त्यापैकी ११ गावांचे टँकर मंजुरीसाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले, तर सात गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव नुकतेच प्राप्त झाल्याने तेही प्रस्ताव तपासणीनंतर व त्या गावातील पाण्याची सद्य स्थिती पाहून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई गंभीर होत जाणार असल्याची चिन्हं आहेत.