esakal | उर्जामंत्री राऊत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, वाचा कोणी केली मागणी?
sakal

बोलून बातमी शोधा

Parner's MNS has demanded that a case of fraud be filed against Power Minister Raut as the power distribution company in Parner has cheated the public by sending increased bills..jpg

कोरोना काळात शहरी तसेच ग्रामीण भागातही मीटरचे वाचन न करता ग्राहकांना विजबिले देण्यात आली होती. त्यामुळे वापरापेक्षा कितीतरी अधिक बिले ग्राहकांना आली.

उर्जामंत्री राऊत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, वाचा कोणी केली मागणी?

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : कोरोना काळात राज्यात विजवितरण कंपनीने मीटरचे वाचन न करता गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात वाढीव बिले पाठविली व त्याची वसुलीही केली. अशा प्रकारे विजवितरण कंपनीने वाढीव बिले पाठवून जनतेची फसवणूक केली आहे. त्यात उर्जा मंत्री नितिन राऊत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन पारनेर तालुका महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्या नेतृत्वाखाली पारनेर  व सुपे पोलिस ठाण्यात देण्यात आले. 

कोरोना काळात शहरी तसेच ग्रामीण भागातही मीटरचे वाचन न करता ग्राहकांना विजबिले देण्यात आली होती. त्यामुळे वापरापेक्षा कितीतरी अधिक बिले ग्राहकांना आली. त्याचा ग्राहकांना मोठा भुर्दंड बसला होता. त्यावेळी ग्रामीण व शहरी भागातूनही विजवितरण कंपनीच्या विरोधात वाढीव बिलाबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र ग्राहकांना आता तुम्ही बिले भरल्यानंतर ती कमी करून दिली जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र ते आश्वासन पाळले गेले नाही. याचा निषेध करत मनसेच्या वतीने ज्या ग्राहकांना अधिक वाढीव बिले आली ती कमी करावीत व या पुढील काळात येणा-या बिलातून ती वजा करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली.

या वेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्या नेतृत्वाखाली पारनेर व सुपे पोलिस ठाण्यात जनतेची वाढीव लाईटबिल पाठवून फसवणूक केली. त्यामुळे  उर्जा मंञी राऊत यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हा उपअध्यक्ष मारुती रोहकले, सहकार सेनेचे  नितिन म्हस्के, तालुका उपाअध्यक्ष अविनाश पवार, वशिम राजे, सतीश म्हस्के, महेंद्र घाडगे, नारायण नरवडे, रावडे, अजय दावभट, अक्षय सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
 

loading image