

सोनई : छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला भरधाव वेगात चाललेल्या आरामबसने खडकाफाटा येथे भुसा घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील एक प्रवाशाचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले आहेत. काल सोमवारी मध्यरात्री एक वाजता अपघात झाला. जोराची धडक बसल्याचा मोठा आवाज होताच परिसरातील ग्रामस्थ व व्यावसायिक घटनास्थळी जमा झाल्याने जखमींना तातडीने रुग्णालयात हलविणे सोपे झाले.