
कर्जत : सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांमध्ये वाद वाढले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महामंडळाने ''यूपीआय'' या डिजिटल पद्धतीचा अवलंब केला आहे. तिकीट मशिनमध्ये बदल केल्याने व ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन दिले जात असल्याने ग्रामीण भागातही यूपीआयद्वारे तिकीट घेण्याचा कल वाढला आहे.