
शिर्डी : सावळीविहीर ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गाच्या दुर्दैवाचे दशावतार सुरूच आहेत. त्याचबरोबर नवा क्रमांक घेऊन कोपरगावकडे जाणाऱ्या ११ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाची काही ठिकाणी दुरवस्था झाली आहे. एका बाजूने काँक्रिटीकरणाची पट्टी पूर्ण झाल्याने दिलासा मिळाला.