लालपरी नसल्याने नागरिकांची अडचण... दुसरीकडे मात्र

मार्तंड बुचुडे
Wednesday, 5 August 2020

गरीबांचे वाहान म्हणून अनेक वर्षापासून लोकप्रीय असलेली लालपरी बंद असल्याने सर्व सामान्य गोरगरीबांच्या प्रवासाची मोठी कुचंबना झाली आहे.

पारनेर (अहमदनगर) : गरीबांचे वाहान म्हणून अनेक वर्षापासून लोकप्रीय असलेली लालपरी बंद असल्याने सर्व सामान्य गोरगरीबांच्या प्रवासाची मोठी कुचंबना झाली आहे.

नोकरी निमित्ताने जा ये करणाराणांही अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. तसेच ज्यांच्याकडे चारचाकी किंवा दुचाकी आहे, त्यांना अडचण नाही. मात्र ज्या गोर गरीबांकडे गाडी नाही त्यांची मोठी पंचायत झाली आहे. त्यामुळे किमान तालुक्‍यातील तालुक्‍यात काही मार्गावर बस सेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशामधून होत आहे. 

सामान्य जनतेची व विशेषताः ग्रामिण भागातील गोरगरीबांच्या प्रवासाचे एकमेव साधन म्हणजे राज्य परीवहण महामंडळाची लालपरी (बस) सुरू करावी, अशी मागणी होत आहे. सध्या खाजगी वाहतुकीवरही बंधण आहे तर किमान ही बससेवा तरी सुरू करम्याची मागणी अता होत आहे. 

अनेकांना पारनेर तहसील कार्यालय किंवा इतरत्र सरकारी कामानिमित्ताने पारनेरला येणे गरजेचे असते. मात्र अता सर्वांनचीच अडचण झाली आहे. गेली अनेक वर्षात एक दिवस जरी ही बस सेवा बंद झाली तरी मोठी ओरड झाल्याचे आपण पहात अहोत. बससेवा बंद झाल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. गेली तीन महिण्यापेक्षा अधिक काळ ही सेवा बंद आहे त्यामुळे जिल्हाअंतर्गत किंवा तालुका अंतर्गत तरी ही सेवा सुरू करावी अशी मागणी प्रवाशी संघटणा तसेच ग्राहक मंचातचर्फे होत आहे. 

पारनेर आगारामार्फत फक्त सुपे मार्गे नगर सहा फे-या व जामगाव मार्गे नगर तीन फे-या अशा फक्त 9 फे-या सुरू आहेत मात्र तालुक्‍यातील इतर गावांमधील प्रवाशांना पारनेरला किंवा नगरला जाण्यासाठी अद्याप काहीच व्यवस्था नाही. त्यामुळे अनेकांची कुचंबणा होत आहे. मात्र ज्या बस सुरू आहे त्या बसेसच्या फे-याही तोट्यात सुरू आहेत. या मार्गावर प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही सुपे मार्ग सहा बसजातात व परत येतात तर जामगाव मार्गे तीन बस जातात व परत येतात त्यांचे सरासरी दोन ते तीन हजार रूपये प्रती फेरी भाडे मिळते आहे. 

पारनेर वरून नगरला सुपे मार्गे सहा व जामगाव मार्गे तीन बस जातात व परत येतात. मात्र त्यांचे इंधनाचे पैसेही वसुल होत नाहीत. अद्याप प्रवाशी बसमध्ये बसण्यास तयार नाहीत. बसेस पारनेरला आल्यावर तसेच नगर येथे गेल्यावरही सॅनिटाझर होतात. प्रवाशांची आम्ही सर्व प्रकाची काळजी घेत आहोत. प्रवाशांना बसमधून प्रवास करण्यास कोणताच धोका नाही. मात्र प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. या बसेसच्या इंधनाचे पैसे सुद्धा वसुल होत नाहीत. 
- पराग भोपळे,आगार प्रमुख पारनेर
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passengers question when ST bus will start in Parner taluka