

Firefighters brought a blaze under control after five shops were damaged at Bhutetkali Phata in Pathardi.
esakal
पाथर्डी,: तालुक्यातील पाथर्डी-खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरील भुतेटाकळी फाटा येथे बुधवारी सकाळी पाच दुकानांना भीषण आग लागली. दुकानांमधील साहित्य व फर्निचर जळून खाक झाले. व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास एका दुकानातून धूर येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले.