
पिंपरी : आशा सेविका असलेल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने तिचा गळा आवळून खून केला. तसेच, स्वत:ही गळफास घेऊन, आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारानंतर पोलिसांनी पतीला चौकशीसाठी चिखली पोलिस ठाण्यात आणले असता, त्याने स्वच्छतागृहात फरशी पुसण्याचे लिक्विड प्राशन केले. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (ता. १८) रात्री सव्वाआठच्या सुमारास घडला. शनिवारी (ता. १९) पहाटे पावणेतीनच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.