खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा असलेल्या पाथर्डीच्या माजी सभापतींचा अटकपूर्व जामीन फेटाळला

राजेंद्र सावंत
Friday, 28 August 2020

शिराळ येथील खुनाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमाचे उल्लघन केल्याप्रकरणी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती भरत पालवे, सचिन वाघ यांचे अटकपुर्व जामीन अर्ज अहमनगर येथील न्यायाधीश प्रविण चातुर यांनी गुरुवारी फेटाळले.

पाथर्डी (अहमदनगर) : शिराळ येथील खुनाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमाचे उल्लघन केल्याप्रकरणी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती भरत पालवे, सचिन वाघ यांचे अटकपुर्व जामीन अर्ज अहमनगर येथील न्यायाधीश प्रविण चातुर यांनी गुरुवारी फेटाळले.

शिराळ येथे ५ जुलै 2020 रोजी रामनाथ वाघ व त्यांच्या कुंटुबीयावर सचिन वाघ, संभाजी पालवे व त्यांच्या सहका-यांनी हल्ला केला होता. यामधे तलवार, पिस्तुल, लोखंडी गज व लाकडी दांडके यांचा वापर केला होता. वाघ यांनी पाथर्डी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणात संभाजी पालवे, भरत पालवे, सचिन वाघ यांनी अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले होते. न्यायाधीश प्रविण चातुर यांच्या समोर जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद एकुन घेतल्यानंतर चातुर यांनी जामीन अर्ज फेटाळण्याचे आदेश दिले. अतिरिक्त सरकारी वकील विष्णुदास भोर्डे यांनी सराकरी पक्षाच्या वतीने काम पाहीले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pathardi Former chairman Sambhaji Palve bail denied by court