
अहिल्यानगर : पाथर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजरोसपणे सुरू असलेल्या मावा सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. त्यात तीन लाख ८२ हजार रुपये किमतीची सुगंधी तंबाखू, सुपारी, तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईत चौघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.