
पाथर्डी : पालिका हद्दीतील संत वामनभाऊनगरमधील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या आहेत. या पाईपलाईन दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी आज युवासेनेचे शहर प्रमुख सचिन नागापुरे यांनी पालिका कार्यालयात पुंगी बजाव आंदोलन केले. मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी समस्यांचे निराकरण केले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.