Pathardi News : चुकून आलेले दोन लाख केले परत; माजी सैनिक शिरसाट यांचा प्रामाणिकपणा
साकेगाव येथील महिला शेतकरी शीलाबाई मुरलीधर तांबे यांची कर्जाची रक्कम अधिकाऱ्यांकडून चुकून शिरसाट यांच्या खात्यावर जमा झाली. महिला शेतकऱ्याचे चुकून खात्यात आलेले एक लाख ९० हजार रुपये माजी सैनिक अशोक म्हातारदेव शिरसाट यांनी ते परत केले आहे.
पाथर्डी : महिला शेतकऱ्याचे चुकून खात्यात आलेले एक लाख ९० हजार रुपये माजी सैनिक अशोक म्हातारदेव शिरसाट यांनी ते परत केले आहे. पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील माजी सैनिक अशोक शिरसाट यांचे पाथर्डी येथील भारतीय स्टेट बँक शाखेमध्ये खाते आहे.