लोकांनीच बंद पाळुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सामुहीक प्रयत्न करण्याची गरज

राजेंद्र सावंत
Sunday, 9 August 2020

पाथर्डी तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या ५४० झाली आहे. तर तिघांचा कोरोनाने आतापर्यंत बळी घेतला आहे. पोलिस कर्मचारी, महसुल विभागातील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

पाथर्डी (अहमदनगर) : तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या ५४० झाली आहे. तर तिघांचा कोरोनाने आतापर्यंत बळी घेतला आहे. पोलिस कर्मचारी, महसुल विभागातील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

शहर व तालुक्याच्या ग्रामिण भागात कोरोनाने जोमाने फैलाव केला आहे. तालुक्याला आता जनता कर्फ्युची (स्वतःहुन केलेला बंद) गरज आहे. प्रशासनाने निर्बंध लादुन आता काही होणार नाही लोक ऐकायला तयार नाहीत. लोकांनीच बंद पाळुन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सामुहीक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

तालुक्यात रोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सुरुवातील दिवसाला दोन, पाच हा आकडा आता थेट पन्नास ते पंच्चावन्न पर्यंत जावुन पोहचला आहे. शनिवारी सायंकाळ पर्यंत पाचशे चालीस जणांना ककोरोनवाची लागण झाली आहे. त्यांपैकी तिनजणांचा बळी गेला आहे. सरकारी रेकाँर्डवर नसलेले मात्र कोरोनामुळे मयत झालेला शहरातील आकडाही सात ते आठ असल्याचे समजते. आतापर्यंत पाथर्डी शहरात आरोग्य विभागाने पंधराशे एकोनावीस लोकांची तपासणी केली आहे. तर नगर येथे दोनशे सत्यांशी लोकांचे स्त्राव तपासले आहेत. 

अठराशे सहा लोकांची तपासणी झाल्यानंतर पाचशे चाळीस बाधीत सापडले आहेत. बाराशे सहासष्ठ लोकांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रामाणही चांगले आहे.

प्रांतअधिकारी देवदत्त केकाण, पोलिस उपअधिक्षक मंदार जवळे, तहसिलदार नामदेव पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक कराळे,पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,तालुका आरोग्य अधिकारी ड़ॉ. भगवान दराडे, कोवीड प्रमुख डॉ. महेंद्र बांगर या सर्व अधिका-यांसह कर्मचा-यांनी खुप चांगले काम केले आहे. लोकप्रतिनिधी, सत्ताधारी आघाडीतील नेते,विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनीही योगदान दिले आहे. तरीही आता कोरोनाची परस्थीत गंभीर बनली आहे. कोरोनाची साखळी तोडण्याासाठी जनता कर्फ्युजी गरज आहे.

जनेतेने लाँकडाऊन संपले म्हणुन कोरोनाचे नियम पाळणे सोडु नये. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारी अधिकारी व कर्मचा-याने आग्रही असले पाहीजे ही अपेक्षा चांगली नाही. नागरीकांनी आता सोशल डिस्टन्स पाळलेच पाहीजे. मास्क बांधणे, विवाह, अत्यंविधी, दहावे, वाढदिवस या कार्यक्रमात गर्दी करु नये. जनतेच्या सहभागाशिवाय आम्ही चांगले काम करु शकत नाहीत. नियम पाळुन सहकार्य कारवे.
- नामदेव पाटील, तहसिलदार, पाथर्डी 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pathardi taluka 540 corona positive patients and three died