esakal | ह्रदयद्रावक ः बेड न मिळाल्याने रूग्णाचा तडफडून मृत्यू!

बोलून बातमी शोधा

The patient died due to lack of bed

जिल्ह्यातील एका गावातील रुग्णाचा स्कोअर वाढल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.

ह्रदयद्रावक ः बेड न मिळाल्याने रूग्णाचा तडफडून मृत्यू!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः कोरोनाचा प्रादूर्भाव जिल्ह्यात वाढलेला असून रोज बाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने तडफडून मृत्यू होत असल्याची बाब (सोमवारी) उघडकीस आली. आधी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार आणि आता बेडच नसल्याने नागरिकांवर तडफडून मरण्याची वेळ आलीय.

जिल्ह्यातील एका गावातील रुग्णाचा स्कोअर वाढल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र जिल्हा रुग्णालयातील सर्वच बेड हाऊसफूल असल्यामुळे त्याला उपचारासाठी दाखल करून घेणे शक्‍य नव्हते. त्यामुळे खासगी रुग्णालयात हलविण्याच्या सूचना जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आल्या.

त्यानंतर त्या रुग्णाला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचारासाठी बेड शिल्लक आहे की नाही, याची विचारणा करण्यात आली. मात्र तब्बल दोन तास रुग्णाला घेऊन शहरात नातेवाईक फिरत होते. परंतु उपचारासाठी बेड न मिळाल्याने पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तोपर्यंत त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. बेड अभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात होता. 

उपचारासाठी सायंकाळच्या सुमारास एक रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आला होता. मात्र, बेड शिल्लक नसल्याने त्याला दाखल करून घेता आले नाही. 
- डॉ.सुनील पोखर्णा, जिल्हा शल्यचिकित्सक