द्राक्ष पिकवायची कशी? कर्जतमध्ये पवारांचे मार्गदर्शन

नीलेश दिवटे
Monday, 7 December 2020

ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी निर्यातक्षम विषमुक्त द्राक्ष उत्पादन घेताना अटोमॅटिक हवामान केंद्राचा उपयोग हा रोग व किड नियंत्रण करण्यासाठी कसा करता येईल? याबाबत मार्गदर्शन केले.

कर्जत : ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती,कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कृषी विभाग महाराष्ट्र शासन, आत्मा अहमदनगर व महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत-जामखेड तालुक्यातील फळबाग समृद्ध होण्याकरीता द्राक्ष पीक परिसंवादाचे तालुक्यातील खैदानवाडी, आखोणी या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.

ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी निर्यातक्षम विषमुक्त द्राक्ष उत्पादन घेताना अॅटोमॅटिक हवामान केंद्राचा उपयोग हा रोग व किड नियंत्रण करण्यासाठी कसा करता येईल? याबाबत मार्गदर्शन केले. व फळबागांचे अधिक प्रमाण असलेल्या या परिसरात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शितकेंद्रांची उभारणीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापण्याची आवश्यकता असल्याचे नमुद केले. 

कर्जतचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गवांदे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगत शेतकऱ्यांना शेतीपुरक जोडधंदे याविषययी मार्गदर्शन केले. राहुल रसाळ यांनी द्राक्ष बागांमध्ये कमी पाण्यामधील जमिनीखालील ठिबक सिंचनाचा वापर व द्राक्ष पिकाची गुणवत्ता वाढवण्यासाठी बायोगॅस स्लरीचा वापर तसेच 'आरो पाण्याचा फावरणीसाठी वापर' या विषयी मार्गदर्शन केले.

चिपळूणकर यांनी विषमुक्त द्राक्ष उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता व सेंद्रिय कार्बाची पातळी याविषयी मार्गदर्शन केले.सदाशिव शेळके यांनी विषमुक्त द्राक्ष उत्पादन व प्रतिकुल हवामानात द्राक्षबागांचे व्यवस्थापण यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे सर्व संचालक,कर्जतचे तालुका कृषि अधिकारी दिपक सुपेकर,जामखेडचे तालुका कृषि अधिकारी सुधिर शिंदे,मृदा शास्त्र विषय विशेषज्ञ विवेक भोईटे,ओंकार ढोबळे,आभिजीत गदादे,कृषि विभागाचे सर्व कर्मचारी तसेच कर्जत व जामखेड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

त्याच त्या पिकांच्या जोखडात अडकण्यापेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळ आणि फुल बागांना प्राधान्य दिले आहे.मनात इच्छा असूनही अचूक मार्गदर्शना अभावी त्यांना प्रायोगिक शेती करता येत नव्हती. मात्र, या परिसंवादा मुळे शेतकऱ्यांना मोठी ऊर्जा मिळाल्याची कार्यक्रमस्थळी चर्चा होती.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pawar's guidance in grape growing in Karjat