नगरकरांना दिलासा; ही व्यक्ती झाली कोरोनामुक्त 

This person became Corona free
This person became Corona free
Updated on

नगर : जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे 18 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 11 व्यक्तींचे अहवाल काल (बुधवार) निगेटिव्ह आले होते. आज उर्वरित सात व्यक्तींचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, आलमगीर येथील एका 31 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा 14 दिवसानंतर घेण्यात आलेले दोन्ही चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे त्याला आज (गुरुवार) बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. नगरकरांना काहीसा दिलासा मिळाला असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता 25 झाली आहे. 

प्रशासनाने जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजनेची काटेकोर अंमलबजावणी केली. त्यात नागरिकांचा सहयोगही महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ग्रामसुरक्षा समितीचा वाॅच

जिल्हा प्रशासनाने सावध भूमिका घेत जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे बाहेरगावावरून येणाऱ्या लोकांवर वॉच ठेवता येणार आहे. त्यांची तपासणी करून त्यांना ज्या गावात सापडेल, त्याचठिकाणी 14 दिवस क्वारंटाईन करून ठेवण्यात येणार आहे. 


कोरोना मीटर 
1539 व्यक्तींची तपासणी 
44 पॉझिटिव्ह 
1468 निगेटिव्ह 
87 निरीक्षणाखाली 
778 होम क्वारंटाईन 
06 अहवाल येणे बाकी 
25 रुग्णांना डिस्चार्ज 
03 जणांचा मृत्यू 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karjat Sets an Example of Humanity as Volunteers Stand by Their Sick Companion
Parents Trust the School, Infrastructure Fails the Students in Akole
Compassion in Action: Hingani Dumala Villagers Support Family After Tragic Loss
Anna Hazare’s Protest Averted as Maharashtra Govt Stays New RTI Rules
Marathi News Esakal
www.esakal.com