
संगमनेर : सायखिंडी फाटा (ता. संगमनेर) येथे नव्यानेच झालेल्या डी-मार्टच्या वाहनतळावर उभ्या कारमधून खिडकीची काच फोडून चोरट्याने छायाचित्रकाराची चार लाख १७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल असलेली पिशवी चोरून नेल्याची घटना रविवारी (ता. ६) रात्री सात ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.