अहमदनगर : पुलावरील खड्डे; मृत्यूचे अड्डे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pits in middle of road on bridge over river Bhima danger for transportation

अहमदनगर : पुलावरील खड्डे; मृत्यूचे अड्डे

सिद्धटेक : भीमा नदीवरील पुलावरील रस्त्याची दोन वर्षांपूर्वी दुरुस्ती केल्यानंतर आता तो पुन्हा उखडला आहे. सद्यःस्थितीत वाहतुकीसाठी धोक्याचा झाला आहे. रस्त्यात मध्यभागी खड्डे पडले असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

दोन वर्षांपूर्वी मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आला होता. नदीच्या जोरदार प्रवाहाचे पाणी पुलावरून गेल्याने पुलावरील रस्ता उखडला होता. त्यावेळी महिनाभर वाहतूक बंद ठेवून रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने केली होती. १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल सुस्थितीत असताना दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या दुरुस्ती कामाचा दर्जा यातून स्पष्ट होतो. खड्डे चुकविण्याच्या घाईत वाहनचालकांकडून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

पवारांचे लक्ष, पण तरीही

पुणे व अहमदनगर या जिल्ह्यांना जोडणाऱ्या या पुलाच्या तेव्हा झालेल्या दुरुस्तीच्या कामाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष दिले होते. या कामाला प्रत्यक्ष भेट देऊन, काम योग्य दर्जाचे करण्यासाठी बांधकाम अधिकारी व ठेकेदार यांची कानउघाडणीही केली होती. मात्र, तरीही कामाचे व्हायचे तेच झाले.

Web Title: Pits In Middle Of Road On Bridge Over River Bhima Danger For Transportation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top