
भंडारादरा ते रंधा रस्त्यांची चाळण झाल्याने वाहने चालविणे सोडाच मात्र पायी चालणे देखिल आवड झाले आहे.
अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील भंडारादरा ते रंधा रस्त्यांची चाळण झाल्याने वाहने चालविणे सोडाच मात्र पायी चालणे देखिल आवड झाले आहे. याकडे बांधकाम विभाग आक्षरशा डोळेझाक करत असल्याने या परिसरातील रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रंधा- भंडारदरा या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या भंडारदऱ्याला जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने परिसरातील वाहनचालक, शेतकरी, दुग्ध व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी, वयोवृद्ध ग्रामस्थ आदी नागरिकांना या रस्त्याने नेहमी ये-जा करावी लागते. या ठिकाणी दररोज हजारो पर्यटक पर्यटकांनासाठी येतात. त्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गावांमधील रुग्णवाहिकांनादेखील याच रस्त्याचा वापर करावा लागतो. पेसा ग्रामपंचायत सरपंच परिषदेचे सचिव पांडुरंग खाडे यांनी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरवस्थेने परिसरातील नागरिक संतप्त आहेत. याच्या संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन दखल घेऊन रंधा ते भंडारादरा कमीत कमी 8 किमीचा रस्ताची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अन्यथा परिसरातील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, तर सध्या स्थितीला भंडारदरा ते शेंडी रस्ताचे काम चालू असल्याने बराच रस्ता खोदला गेला आहे.
मात्र हे काम अतिशय संत गतिने चालु आसुन या मार्गावरील इगतपुरी आगार सोडता सर्वच आगाराच्या बस सेवा चार महिने झाले बंद आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या प्रवास्याचे मोठे हाल होत आहेत. तेव्हा या मार्गावरील सर्व आगारानी बस वाहतूक पुन्हा सुरु करावी व या रस्त्याचे काम जलद गतीने पुर्ण करा व या अती दुर्गम आदिवासी भागातील आदिवासी लोकांना वेठिस धरु नका अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल, असे पेसा ग्रामपंचायत सरपंच परिषदेचे सचिव पांडुरंग खाडे यांनी सांगितले आहे.
तर हा आती दुर्गम आदिवासी भाग असल्याने प्रशासन जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा मोठा आरोप विजय भांगरे यांनी केला आहे. तर लवकरात लवकर लक्ष्य देऊन काम चालु करावे यासाठी आज बांधकाम विभाग व माजी आमदार वैभव पिचड यांना निवेदन देण्यात आले.
संपादन : अशोक मुरुमकर