घरच्या घरी होईल मधुमेह, मुतखड्याचा इलाज...ही वनस्पती खा

This plant is good for health
This plant is good for health

अकोले : चिरतरूण रहायची सगळ्यांची इच्छा असते. परंतु नोकरीतील तणाव, सकस आहार खाण्यात न आल्याने माणसाच्या शरीराची झीज होते. चेहर्यावर सुरकुत्या पडतात. त्यामुळे अनेक औषध कंपन्यांनी वेगवेगळी अौषधे बाजारात आणली आहेत. परंतु ती उपायकारक ठरतीलच याची शाश्वती नाही. परंतु आदिवासी पाड्यात एक जंगली वनस्पती आहे. ती खाल्ल्याने तुम्ही तरूण दिसाल. चेहऱ्यावरचे डाग, व्रणही घालविता येतात.

विशेष म्हणजे ही वनस्पती दुर्धर आजारावर गुणकारी आहे.कॅन्सरलाही ती पळवून लावते. एवढेच कशाला एखादा दारू पिऊन (बेक्कड) लिव्हर खराब झाले असेल तर त्याचे लिव्हरही ही वनस्पती पूर्ववत करते. मधुमेहामुळे अनेकांचे मोठे नुकसान होते. त्यासाठी लाखो रूपये खर्च केले जातात. परंतु मधुमेह काही कमी होत नाही.

या वनस्पती सेवनाने वृद्धापकाळ लवकर येत नाही तर कॅन्सरसारखा दुर्धर आजार कोसो मैल दूर पळतो. मधुमेह रुग्णांना शरीरातील साखर कमी करण्यास ही वनस्पती मदत करते. तर छोट्या-मोठ्या २५ आजारावर ही गुणकारी आहे. ती वनस्पती म्हणजे शतावरी. त्याबद्दल वनस्पती संशोधक डॉ. भाऊराव उघडे माहिती सांगतात. 

या भागात आढळते

अकोले तालुक्यात ही वनस्पती दुर्मिळ होत असली तरी सातेवाडी, खेतेवाडी, कोतूळ, गर्द्नी, ढोकरी, उंचखडक, या भागात ती सापडते. मात्र, तिचे संवर्धन करण्याची गरज अाहे. काही शेतकऱ्यांनी तिच्या लागवडीसाठी पुढे यावे असा आमचा प्रयत्न असल्याचे डॉ. उघडे म्हणाले. 
 

उत्पादन
* पांढरी शतावरी १० ते १२ टन प्रतिहेक्टर मुळ्या मिळतात.
* पिवळी शतावरी ४ ते ६ टन प्रतिहेक्टर मुळ्या मिळतात.

औषधी महत्त्व
ही चवीस कडू व पचनास गोड़ असते.
ही वात व पित्तनाशक असून सर्व शरीरधातूंना बल देणारी, वृद्धीचा तल्लखपणा वाढविणारी व डोळ्यांभोवतालची काळे वर्तुळे घालवते, शरीराची कार्यक्षमता वाढवते, चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही. गुलाबपाणी, दुधामध्ये शतावरी वनस्पती मिळवून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरचे पुरळ, काळे डाग नाहीसे होतात. ५ ग्रॅम शतावरी गाईच्या दुधात सेवन केल्यास शरीरातील रक्त वाढते, अर्धा चमचा गोखरू व शतावरी पावडर करून घेतल्यास मूत्राशयाचा त्रास कमी होतो, जळजळ, रक्त येणे थांबते , सल्फोराफेन नावाचे घटक शतावरीमध्ये असल्याने कॅन्सरसारखा दुर्धर आजार नाहीसा होतो . 

  • अपचन आणि जुलाब यासाठी मधातून शतावरी दिली जाते.
  • शक्ती वाढविण्यासाठी शतावरी चूर्ण दुधात खडीसाखर मिसळून द्यावे.
  • मुतखड्यासाठी शतावरीचा रस सात दिवस सकाळच्या वेळी घ्यावा.
  • शरीरात बाढलेल्या पितामुळे छाती दुखणे, घशाला जळजळ, तोडास कोरड पडणे, डोके दुखणे,
  • आंबट कडू ढेकर, बेंबीभोवती पोट दुखणे या व्याधीवर गुणकारी आहे.
  • मूत्राशयाच्या रोगावर व बाळतपणात मातेस दूध सुटण्यासाठी शतावरी अत्यंत उपयुक्त आहे. अल्कोहोलमुळे लिव्हर खराब झाले असेल तर तेही पूर्ववत करण्याची शक्ती शतावरीमध्ये असल्याचे डॉ . भाऊराव उघडे यांनी सांगतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com