झाडे दत्तक घेत सत्यजीत तांबेसमर्थक बनले पर्यावरणरक्षक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख यांच्या पुढाकारातून तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नगर : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्यावतीने  संजय नगरमधील जंगे शहीदा कब्रस्थान आवारामध्ये काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख यांच्या पुढाकारातून तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुबीन शेख, गुड्डू शेख, शरीफ सय्यद, वाहिद शेख, अभिजीत वर्तले, नितीन वर्तले आदी उपस्थित होते. 

यावेळी काळे म्हणाले की, सत्यजितदादा तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. अल्पसंख्याक विभागाच्या वतीने घेण्यात आलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे. अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख हे अल्पसंख्यांक बांधवांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. 

यावेळी बोलताना अज्जूभाई शेख म्हणाले की, या कार्यक्रमप्रसंगी केवळ वृक्षारोपण करून थांबणार नाही. तर लावलेली झाडे अल्पसंख्याक विभागाच्यावतीने आम्ही दत्तक घेतली आहेत. या झाडांचे संगोपन करत कब्रस्तान परिसरातीचे सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.

संपादन - अशोक निंबाळकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plantation on Satyajit's birthday