लागवडीपासून तोडणीपर्यंत 'नागवडे'चा सर्व कारभार अॉनलाईन

संजय आ. काटे
Sunday, 11 October 2020

नागवडे साखर कारखान्याच्या 46व्या गाळप हंगामाचा प्रारंभ नगराध्यक्ष शुभांगी व मनोहर पोटे, सभापती गीतांजली व शंकर पाडळे यांच्या हस्ते झाला. नागवडे म्हणाले, ""आम्ही शेतकरी, सभासदांशी विश्वासाचे नाते जपण्याचे काम केले.

श्रीगोंदे : साखर कारखानदारीत स्पर्धा वाढते आहे. नागवडे कारखान्याने कायमच ऊसतोडणीतील शिस्तीला प्राधान्य दिले. आता त्यात आधुनिकता आणताना, ऊसलागवडीपासून तोडणीपर्यंतचा सगळा कारभार ऑनलाइन करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. 

नागवडे साखर कारखान्याच्या 46व्या गाळप हंगामाचा प्रारंभ नगराध्यक्ष शुभांगी व मनोहर पोटे, सभापती गीतांजली व शंकर पाडळे यांच्या हस्ते झाला. नागवडे म्हणाले, ""आम्ही शेतकरी, सभासदांशी विश्वासाचे नाते जपण्याचे काम केले.

देशात साखर अतिरिक्त होत असल्याने, दर कमी होत असले, तरी शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देण्यासाठी नागवडे कारखाना 60 हजार क्षमतेची डिसलरी व इथेनॉल प्रकल्पाचे काम हाती घेणार आहे. ऊसतोडणीपासून ते गाळप होईपर्यंत ऑनलाइन पद्धती राबविणार आहोत. हंगामी कामगारांना 15 नोव्हेंबरपासून कायम करणार आहोत.'' 

उपाध्यक्ष केशव मगर म्हणाले, की नागवडे कारखाना अधिक काटकसरीने चालविताना सभासदांच्या अपेक्षेला उतरावे लागणार आहे. जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे, ताराबाई पंधरकर, बाबासाहेब इथापे, जिजाबापू शिंदे, ऍड. बाळासाहेब काकडे, विठ्ठल पाचपुते, समीर बोरा, एस. पी. कोंथिबीरे, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक उपस्थित होते. 
सूत्रसंचालन सुभाष शिंदे यांनी केले. प्रा. सुनील माने यांनी आभार मानले.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From planting to harvesting, all the affairs of 'Nagwade' are online