

Ahilyanagar
esakal
अहिल्यानगर: खरीप हंगाम २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना नगर जिल्ह्यात लागू केली आहे. जिल्ह्यातील भात, बाजरी, भुईमूग, कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, मका, उडीद आणि कांदा या दहा पिकांचा यामध्ये समावेश आहे. इच्छुक शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. यंदा जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी इफको टोकीयो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नियुक्त केली आहे.