भंडारदरा धरणाच्या वाढदिवसानिमित्त कविसंमेलन

शांताराम काळे
Saturday, 12 December 2020

भंडारदरा धरणाचा 94 वा वाढदिवस रान कवी तुकाराम धांडे यांच्या बाई मी धरण बांधिते, सरत आली शंभर वर्षे अमृत शिंपण करता करता वीज निर्मिती सुद्धा करिशी, तूच ही आमचा त्राता सायब व या कवितेने साजरा करण्यात आला.

अकोले (अहमदनगर) : भंडारदरा धरणाचा 94 वा वाढदिवस रान कवी तुकाराम धांडे यांच्या बाई मी धरण बांधिते, सरत आली शंभर वर्षे अमृत शिंपण करता करता वीज निर्मिती सुद्धा करिशी, तूच ही आमचा त्राता सायब व या कवितेने साजरा करण्यात आला.

यावेळी विकास पवार म्हणाले, भंडारदरा धरण शतकपुर्ती प्रवास या ई पुस्तकाचे लेखक यांनी उपस्थितांना जलाशयाच्या जन्मापासून माहिती दिली. या जलाशयाचे इंजिनियर इंग्रज अधिकारी ऑर्म विल्सन यांचेही स्मरण करण्यात आले. तेजस शिंदे (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक), प्रकाश चव्हाण (बिनतारी यंत्रचालक) यांच्या हस्ते जलाशयाच्या पाण्यात नारळ, पेढे व फुले सोडुन जलपुजन केले गेले. 

सायंकाळी 6 वाजता छोटेखानी कविसंमेलनात रानकवि तुकाराम धांडे, युवा कवी गणेश गायकवाड, सागर खाडगीर, विकास पवार आदी सहभागी झाले. या कार्यक्रमासाठी, वसंत भालेराव, गोपीनाथ भांगरे, स्वप्निल शहा, जयशींग शिंदे उपस्थित होते. या धरणाची शंभरावी साजरी करण्यासाठी आत्तापासूनच तयारी करणार असल्याचे अभिजीत देशमुख यांनी सांगीतले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poetry meeting on the occasion of Bhandardara Dam birthday