पोहेगांव पतसंस्थेकडून सभासदांना नऊ टक्के लाभांश वाटप

मनोज जोशी
Sunday, 15 November 2020

जिल्हा पतसंस्थेच्या चळवळीत अग्रस्थानी असलेल्या येथील पोहेगाव नागरी पतसंस्थेने सभासदांना नऊ टक्के लाभांशाचे वाटप तर कर्मचाऱ्यांना दहा टक्के बोनस वाटप केला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक नितीन औताडे यांनी दिली.

कोपरगाव (अहमदनगर) : जिल्हा पतसंस्थेच्या चळवळीत अग्रस्थानी असलेल्या येथील पोहेगाव नागरी पतसंस्थेने सभासदांना नऊ टक्के लाभांशाचे वाटप तर कर्मचाऱ्यांना दहा टक्के बोनस वाटप केला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक नितीन औताडे यांनी दिली.
सन 1990 साली 36 हजार रुपये भागभांडवलावर सुरू झालेल्या या पतसंस्थेने आज तब्बल 110 कोटी रुपयांच्या ठेवी पूर्ण केल्या आहेत.

संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे, उपाध्यक्ष विलासराव रत्ने, पतसंस्था फेडरेशनचे संचालक रमेश झांबरे, संस्थेचे व्यवस्थापक सुभाष औताडे, व्यवस्थापक विठ्ठल घारे ,रमेश हेगडमळ, सोमनाथ मोजड, कर्मचारी, प्रतिनिधी यांच्या सहकार्याने संस्थेने शिर्डी व कोपरगाव शहरात संस्थेच्या शाखा स्थापन करून विस्तार वाढवला.

प्रत्येक खातेदाराला व्यवहाराची माहिती एसएमएस द्वारे उपलब्ध करून देण्यात आली असून संस्थेकडे स्वतःचा आय एफ सी कोड असल्याने देशांतर्गत आरटीजीएस व एनएफटी सुविधा जलदगतीने उपलब्ध झाल्याने ग्राहकांना व्यवहार करण्यास मदत मिळाली.संस्थेने पोहेगाव व कोपरगाव शाखेसाठी सुसज्ज इमारती बांधून स्ट्रॉंगरूम व लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिलेली असुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांना 80 टक्के सोनेतारण कर्ज अत्यल्प व्याजदरात उपलब्ध करून दिलेले आहे.तालुक्याच्या उद्योग, व्यवसाय व युवकांना स्वयंरोजगारासाठी माफक व्याजदरात कर्ज वितरण करून शहरासह तालुक्याच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न संस्था करणार असल्याची माहितीही नितीन औताडे यांनी दिली.

संपादन : अशोक निंबाळकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pohegaon Patsanstha distributes nine dividend to its members