संगमनेरमध्ये ४ हजारजण बेफिकीर, १३ लाखांचा दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम

सुमारे एक लाख लोकसंख्येच्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आसपासची बारा गावेही आहेत.

संगमनेरमध्ये ४ हजारजण बेफिकीर, १३ लाखांचा दंड

संगमनेर ः या वर्षाच्या जानेवारीपासून संगमनेर शहर पोलिसांनी कोविडचे उल्लंघन करणाऱ्या 4 हजार 165 जणावर विविध कारणास्तव कारवाई केली असून, तब्बल 12 लाख 77 हजार 700 रुपयांच्या दंडाची वसूली केली आहे. यातून साध्य न झालेले गर्दी कमी करण्याचे लक्ष्य गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या उपस्थितीत सुरु झालेल्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांनी साध्य झाले आहे. (Police action against 4,000 people in Sangamner)

जिल्ह्यात फेब्रुवारीपासून कोविड संक्रमणाची दुसरी लाट उसळण्यापूर्वी कोविड नियमात सुट दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका, व अन्य धार्मिक व इतर कार्यक्रमांमुळे कोवीड संक्रमण वाढले. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विविध आदेशांचा भडीमार झाला. कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनासह पोलिसांची मोठी धावपळ झाली. पोलिसांनीही मोठ्या प्रमाणावर कारवाईचा धडाका लावला.

मागील साडेचार महिन्यात संगमनेर शहर पोलिसांनी कोविड नियमांकडे दुर्लक्ष करणारी सात मंगल कार्यालये अथवा लॉन्सवरील कारवाईत 70 हजार रुपये, शहरातील विविध तपासणी नाक्यांवर नियमभंग करताना पकडलेल्या 3 हजार 960 कारवायांमधून 8 लाख 12 हजार 700 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अथवा अस्वच्छता निर्माण करणार्‍या 198 जणांक़डून 3 लाख 95 हजारांचा दंड वसुल केला गेला.

सुमारे एक लाख लोकसंख्येच्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आसपासची बारा गावेही आहेत. त्या अनुषंगाने पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसुरक्षा समिती सदस्य, तलाठी व गृहरक्षक दलाच्या मदतीने टास्क फोर्स तयार करुन, गावातही यात्रा-जत्रांसह होणारे इतर धार्मिक, सार्वजनिक अथवा खासगी कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

(Police action against 4,000 people in Sangamner)

loading image
go to top