
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एम. सराफ, ए. बी. बनकर, एस. के. कोल्हे, बी. बी. हुलगे, आर. डी. वाजे, पी. बी. आहिरराव यांच्या पथकाने केली.
श्रीरामपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने येथील गोंधवणी परिसरासह सरस्वती कॉलनी, कदमवस्ती, सूतगिरणी परिसरात छापे टाकून गावठी दारू निर्मितीच्या रसायनासह एकूण चार लाख 87 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने काल शहरात कारवाई केली.
यावेळी प्रभाकर गायकवाड, माणिक शिंदे, कचरू गायकवाड (फरार) (सर्व रा. गोंधवणी), उषा काळे, चंद्रकांत पवार (रा.कदमवस्ती), साधना काळे, वंदना काळे (रा. सूतगिरणी परिसर), इंदुबाई जाधव, मीना माने (रा. सरस्वती कॉलनी) यांच्याकडून स्पिरीट, गावठी दारू, रसायन, काळा गुळ, नवसागर, रसायन आणि भट्टी बॅरल, प्लास्टिक कॅनसह दोन दुचाक्या असा एकूण चार लाख 87 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एम. सराफ, ए. बी. बनकर, एस. के. कोल्हे, बी. बी. हुलगे, आर. डी. वाजे, पी. बी. आहिरराव यांच्या पथकाने केली.