
कोपरगाव ः तालुक्यातील येसगाव येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिस हवालदाराला मोटारीतून जाणाऱ्या एकाने मारहाण करत गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिली. काल (शुक्रवार) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. हवालदार विजय अर्जुन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी आरोपी संतोष पुंडलिक सोनवणे (रा. खिर्डी गणेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
हेही वाचा - अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय
फिर्यादीत म्हटले आहे, की तालुक्यातील येसगाव येथील चेकपोस्टवर पोलिस निरीक्षक सचिन इंगळे यांच्यासह पथक कार्यरत होते. रात्री अकराच्या सुमारास एक मोटर (एमएच 14 एएक्स 1888) येवल्याकडून कोपरगावकडे येताना दिसली. त्यातून संतोष सोनवणे आरडाओरड करीत काठी घेऊन खाली उतरले. त्यांनी माझ्या शर्टची कॉलर पकडली होती.
"कशाला गाड्या अडवता? दोन महिन्यांपासून तुम्ही फार मजा करत आहात,' असे म्हणत माझ्या डाव्या पायाला काठीने फटका मारला. माझ्याकडे बंदूक असून गोळी घालून तुला ठार मारीन, अशी धमकी दिली. पोलिसांनी आरोपीसह गाडी ताब्यात घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.