श्रीरामपूर : आरोपीकडे मागितली 2 हजाराची लाच, पोलीस हवालदाराला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shrirampur

श्रीरामपूर : आरोपीकडे मागितली लाच, पोलीस हवालदाराला अटक

श्रीरामपूर : येथील शहर पोलीस ठाण्यात (shrirampur police station) दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन हजाराची लाच घेताना एका पोलिस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने बुधवारी (ता.११) रंगेहात पकडले.

लाच देताना काही छायाचित्र काढल्याचे तपासामध्ये उघकीस

या संदर्भात तक्रार दिलेल्या व्यक्तीच्या नातवंडावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यात मदत करण्यासाठी तसेच चार्जशिटसाठी पोलीस हवालदार संजय रघुनाथ काळे यांनी गुरुवारी (ता. ५) दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेची रक्कम आज (बुधवारी) येथील शहर पोलीस ठाण्यात बिटचौकी प्रभाग तीनच्या कार्यालयात घेताना एसीबीच्या पथकाने पोलीस हवालदार काळे याला पकडले. दरम्यान, तक्रारदार यांनी लाच देताना काही छायाचित्र काढल्याचे तपासामध्ये उघकीस आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलिस निरिक्षक प्रशांत सपकाळे व उज्वल पाटील, पोलीस नाईक प्रकाश महाजन व एकनाथ बाविस्कर यांच्या पथकाने सापळा रचुन केली. एसीबीच्या पथकाने पोलिस हवालदार काळे याला शहर पोलीस ठाणातुन घेवून शहरातील शासकीय विश्रामगृहात नेवून चौकशी करुन कारवाई केली. त्यानंतर तक्रारदाराच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार संजय काळे (वय. ५२) याच्याविरुद्ध लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती एसीबीचे पोलीस निरिक्षक सपकाळे यांनी दिली.

हेही वाचा: नगर-मनमाड महामार्गावर बैलांसह शेकडो शेतकऱ्यांचा रास्ता रोको

हेही वाचा: नेत्यांच्या भूमिकेने कार्यकर्त्यांच्या निष्ठा खुंटीला!

Web Title: Police Constable Caught By Acb While Taking Bribe From Accused

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..