
जामखेड (नगर) : येथील पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानदेव दहिफळे हे येथील लक्ष्मी चौकातील चेक पोस्टवर कर्तव्य बजावत असताना त्यांना अज्ञात व्यक्तीचा एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश सापडला. दहिफळे यांनी त्या व्यक्तीचा सोशल मीडियाचा आधार घेऊन शोध घेतला आणि तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्यामार्फत तो धनादेश त्या व्यक्तीला सुपूर्द केला. यानिमित्ताने दहिफळे यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा पोलीस खात्याची आणि त्यांची उंची वाढविणारा ठरला. या प्रामाणिक पोलिस कर्मचाऱ्यांचा तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी गौरव केला .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या जीवाची परवा न करता पोलिसांनी राज्याच्या विविध भागात दिवस-रात्र चेक पोष्टवर कर्तव्य बजावत आहेत. जामखेड ही त्याला अपवाद नाही. जामखेड शहरात चार पोलिस चेक पोष्ट आहेत. यापैकी येथील लक्ष्मी चौकात उभारलेल्या पोलिस चौकीत दिवस-रात्र पोलिस व अन्य कर्मचारी कर्तव्यावर असतात. यापैकी पोलीस क्वान्स्टेबल ज्ञानदेव दहिफळे हे मंगळवार (ता: २१) रोजी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना एक लाख वीस हजार रुपयाचा स्वाक्षरी केलेला धनादेश सापडला. सदरची रक्कम काँन्स्टेबल दहिफळे बँकेतून काढू शकत होते मात्र त्यांनी तसे केले नाही. तर याबाबतची माहिती आपल्या सहकार्यांसह वरिष्ठांना सांगितली. धनादेश हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेतला आणि त्यांना बुधवार (ता.२२)रोजी तहसील कार्यालयात बोलावले. दहिफळे ही तहसील कार्यालयात पोहचले. त्यांनी सापडलेल्या धनादेशासंदर्भातील संपूर्ण तपशील तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना सांगितला. आणि सापडलेला धनादेश तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, मुख्याधिकारी नेमिनाथ दंडवते व शहरातील प्रमुख व्यक्ती उपस्थितीत होते.
यावेळी तहसीलदार नाईकवाडे यांनी बँकेच्या अधिकार्यांशी संपर्क साधला आणि यासंदर्भातील सत्यता यापासून पाहिली. खातेदाराची ओळख पटली आणि तो धनादेश संबंधित खातेदारास सूपूर्त केला. हरवलेला धनादेश सापडल्याने खातेदारही सुखावला. यानिमित्ताने दहिफळे यांनी दाखविलेला प्रामाणिकपणाचे तहसीलदार नाईकवाडे यांनी कौतुक केले. तसेच दहिफळे यांचा गौरव केला. पोलीस कॉन्स्टेबल दहिफळे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे पोलिस खात्याची व त्यांची स्वतः ची मान उंचावली, हे मात्र निश्चित आहे.
तहसीलदार विशाल नाईकवाडे म्हणाले, पोलिस काँन्स्टेबल ज्ञानदेव दहिफळे यांनी दाखविलेला प्रामाणिकपणा जनतेची पोलिसाप्रती विश्वासार्हता वाढविणारा ठरला आहे.
संपादक- सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.