esakal | मराठा आंदोलकांचा गनीमीकावा ओळखून पोलिसांचही व्यूहरचना
sakal

बोलून बातमी शोधा

Police cordon off Ahmednagar to Aurangabad highway due to agitators

मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांनी बलिदान दिले होते. या घटनेला आज गुरुवारी (ता. २३) दोन वर्ष होत आहेत.

मराठा आंदोलकांचा गनीमीकावा ओळखून पोलिसांचही व्यूहरचना

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे यांनी बलिदान दिले होते. या घटनेला आज गुरुवारी (ता. २३) दोन वर्ष होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या पुतळ्यास अभिवादन व मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिलेला आंदोलनाचा इशारा यामुळे होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर नगर- औरंगाबादच्या शेकडो पोलिसांचा प्रवरसंगम येथील गोदावरी पुलावर आज पहाटे चार वाजल्यापासून नगर- औरंगाबाद पोलिस विभागाने सुमारे 394 पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान सकाळी ११ वाजेपर्येंत याठिकाणी शुकशुकाट होता.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुण आंदोलकाने २३ जुलै २०१८ रोजी नगर- औरंगाबाद जिल्ह्यांना जोडणाऱ्या गोदावरी नदी पुलावरून नदीत उडी मारून बलिदान दिले होते. या घटनेला गुरुवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत.

या पुलावर मराठा क्रांती मोर्चा व इतर मराठा संघटनांनी पुढाकार घेऊन या पुलावर काकासाहेब शिंदे यांचा अर्धपुतळा उभारून या गोदावरी पुलाचे काकासाहेब शिंदे सेतू असे नामकरण केले. त्यामुळे गेल्यावर्षांपासून शिंदे यांच्या बलिदान दिनी याठिकाणी अभिवादन करण्यासाठी नगर-औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातून येणाऱ्या कार्येकर्त्यांनी मोठी गर्दी असते. या पार्श्वभूमीवर आज पहाटे ५ ते सायंकाळी ७ पर्येंत नगर जिल्हा पोलिसांनी नगरहून औरंगाबादकडे जाणारी वाहातून शेवगाव- पैठण मार्गे वळविली आहे.

दरम्यान आज मराठा क्रांती ठोक मोर्चाने बलिदान ते आत्मबलिदान आंदोलनाचा इशारा दिल्याने पोलिसांनी आज पहाटेपासून याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमी व पोलिसांचा तगादा बंदोबस्त यामुळे आंदोलकांचा गनिमीकावा करून आंदोलन करण्याची शक्यता पोलिसांनी गृहीत धरून तशी पोलिसांनीही तशी व्यूहरचना केली. तसा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

नगर- औरंगाबाद मध्यहद्दीत हा कार्येक्रम व आंदोलन होणार असल्याने नेवासे व गंगापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची दोन्ही जिल्ह्यातील पोलीस काळजी घेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणिवेतून येथे गर्दी करू नये असे आवाहन नेवासे पोलीस निरीक्षक रणजित डेरे व गंगापूरचे पोलीस निरीक्षक प्रकाश सुरोवसे यांनी केले आहे. 

असा आहे पोलिस बंदोबस्त
नगर  पोलिस

पोलिस अप्पर अधीक्षक :1, उपाधिक्षक : 1, पोलिस निरीक्षक : 3, सहाययक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्ष : 6, पोलिस हेडकॉन्स्टेबल व शिपाई : 8, महिला पोलिस : 12, होमगार्ड : 5.

औरंगाबाद पोलिस :
पोलिस अप्पर अधीक्षक : 1, उपाधिक्षक: 1, पोलिस निरीक्षक : 5, सहाययक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक : 21, पोलिस हेडकॉन्स्टेबल व शिपाई : 201, महिला पोलिस : 20.

संपादन : अशोक मुरुमकर