Ahilyanagar Crime : बनावट दारू कारखाना उद्ध्वस्त; श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई, तिघे जेरबंद

तीन युवक बनावट देशी दारू तयार करताना आढळले, तसेच तेथे ‘भिंगरी संत्रा’ नावाच्या बाटल्यांमध्ये स्पिरीट व केमिकल मिसळून दारू भरली जात होती. बाटल्यांवर ब्रँड लेबल, बॅच नंबर, सिलिंग मशिन, अशा सर्व यंत्रसामग्रीसह छोटेखानी कारखानाच कार्यरत होता.
Shocking! Fake Liquor Manufacturing Unit Exposed in Shrirampur
Shocking! Fake Liquor Manufacturing Unit Exposed in ShrirampurSakal
Updated on

श्रीरामपूर : भैरवनाथनगरमध्ये कदमवस्ती परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर शहर पोलिसांनी छापा घालत कारवाई केली. यावेळी लाखो रुपयांची बनावट ‘भिंगरी संत्रा’ देशी दारू आणि त्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तिघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. दोन आरोपी आणि घरमालक महिला पसार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com