नगर- कल्याण महामार्गावर चेकनाक्यावर पोलिसांना सापडले...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

नगर- कल्याण महामार्गावर काळेवाडी येथे उभारण्यात आलेल्या चेकनाक्यावर गोमांस वाहतुक करणारा ट्रक रात्री पारनेर पोलिसांनी पकडला.

पारनेर (अहमदनगर) : नगर- कल्याण महामार्गावर काळेवाडी येथे उभारण्यात आलेल्या चेकनाक्यावर गोमांस वाहतुक करणारा ट्रक रात्री पारनेर पोलिसांनी पकडला. यात चालकासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्याकडून ट्रक व गोमांसह सुमारे सहा लाख नऊ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोमवारी (ता. 20 ) पहाटे १ वाजणेच्या सुमारास पारनेर पोलिस ठाणे हद्दीत काळेवाडी चेक नाक्यावर ई- पास तसेच बकर ईदच्या पार्श्वभूमिवर वाहनांची तपासणी करत असताना पोलिस उपनिरीक्षक निरज बोकिल, सत्यम शिंदे, सुरज कदम व इतर कर्मचारी तपासणी करत असताना एक माल ट्रकची तपासणी केली. तेव्हा त्यांना त्या ट्रकमध्ये गोमांस अढळून आले. यावेळी त्यांनी त्या ट्रकसह गोमांस असा सुमारे सहा लाख 99 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. त्या ट्रकचा चालक अनिल भाऊसाहेब मंडलिक व त्याचा मदतनिस गौतम दामोधर झाल्टे ( दोघे रा. संगमनेर) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी चालक मंडलिक व झाल्टे यांच्याविरूद्ध पारनेर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अधिनियम व मोटार वाहन कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पारनेरचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बोकील व त्यांचे सहकारी तपास करत आहेत.

संपादन : अशोक मरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police found beef at Cheknaka on Ahmednagar Kalyan Highway