तीन पोलिसांचे निलंबन; वाळू तस्करीत हात ?

शांताराम काळे 
Wednesday, 11 November 2020

अकोले पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब भोसले, कॉन्स्टेबल धंजय दुडवाल, वाहनचालक चंद्रकांत सदकाल या तीन पोलिसांचे निलंबन केले आहे. 

अकोले (नगर) : अकोले पोलिस व महसूल विभागाने एका वाळू तस्करची वाळू पकडून गाडी पोलिस आवारात लावली होती. दुसऱ्या दिवसी वाळू तसकर विनायक साबळे याची गाडीही पकडली, त्यामुळे आपली गाडी पकडून दिल्याचा संशय येऊन साबळे यांनी पोलिस आवारात असलेल्या वाळू टेम्पोच्या डिस्कस नवीन टायर पोलिसांच्या मदतीने चोरून नेले व ते मूळ मालकाने पाहिल्यावर पोलिसात तक्रार दिली.

आरोपीने सर्व घटना खरी सांगितल्यावर पोलिस इन्स्पेक्टर अरविंद जोंधळे यांनी जिल्हा पोलिस यांचेकडे रिपोर्ट दिला. त्याप्रमाणे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी अकोले पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब भोसले, कॉन्स्टेबल धंजय दुडवाल, वाहनचालक चंद्रकांत सदकाल या तीन पोलिसांचे निलंबन केले आहे. 

याबाबत पी.आय.अरविंद जोंधळे यांनी दिलेली माहिती अशी की, कल्स येथील गणेश शंकर आवारी यांचा टेम्पो एम एच १७ ए.जी.२६०५ हा पोलिसांच्या वाळू तस्करी प्रकरणी २ फेब्रुवारी २०२० ला ताब्यात घेतला होता व पोलिस आवारात असताना जून महिन्यात टेम्पोच्या दोन्ही नवीन चाके चोरून त्या जागी जुने टायर बसविण्यात आले. याचे कारण पोलिसांनी विनायक साबळे याचा वाळूचा ट्रक पकडला.

हा ट्रक गणेश अवारीने खबर दिल्यामुळेच पकडला गेला. याचा राग मनात धरून साबळे याने वाहन चालक सदकाळ यास हाताशी धरून व त्याला दोन हजार रुपये देऊन पहाटेच्या वेळी ज्याक लावून काढत असताना त्यावेळी रात्र पाळीला असणारे हेड कॉन्स्टेबल भोसले यांनी हे पाहिले व गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यालाही आरोपीने दोन हजार रुपये दिले व आरोपीने ते दोन टायर आपल्या गाडीला बसविले.

गणेश आवारी हे आपल्या टेम्पोजवळ आल्यावर त्याने आपल्या गाडीचे नवे टायर जाऊन जुने टायर आल्याचे पाहून त्याने आरोपी साबलेवर नजर ठेवून त्याची गाडी पहिली असता. आपले टायर असल्याचे पाहून त्याने पोलिसात तक्रार दिली. आरोपीला अटक केली असता त्याने खरे सांगितले व पोलिसांनी आपणाला पैसे घेऊन मदत केली आहे. तर भोसले यांनीही त्यास दुजोरा दिल्यामुळे तिघांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. त्यामुळे तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे .

संपादन - सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The police have helped the sand smugglers in Akole