
अहिल्यानगर : शेवगाव येथील मोची गल्लीत राजरोसपणे सुरू असलेल्या आॅनलाईन बिंगो जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एक लाखांच्या मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.