
राहुरी : राहुरी फॅक्टरी येथे प्रसादनगरमध्ये पैशावर हारजितीच्या सुरू असलेल्या पत्त्याच्या तिरट खेळाच्या जुगाराच्या अड्ड्यावर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. त्यात २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, राहुरी पोलिस ठाण्यात १३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.