
सोनई (अहमदनगर): सोनईत कोरोना संसर्ग वाढत असतानाही ठरवून दिलेल्या वेळेनंतरही व्यावसाय करत असलेल्या दहा दुकानांवर सोनई पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईनंतर सर्वत्र एकच धावपळ उडाली. (Police take action against ten shopkeepers in Sonai)
सोनईतील व्यापारीपेठ व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यात सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते. गावातील व्यावसायास सकाळी अकरा वाजेपर्यंत परवानगी असताना दिवसभर चोरुन व्यावसाय होत होता. याविषयी 'सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध होताच सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व पथकाने दिवसभर विशेष मोहीम राबवून दहा जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
सोनई पोलिसांनी व्यावसायिक विजय विश्वनाथ गवळी, वैभव संजय दरंदले, ज्ञानेश्वर काशिनाथ वैरागर, अक्षय बाळासाहेब वाजे, कैलास रामभाऊ पालवे, राहुल शरद तवले ,सोपान कोंडीराम गिऱ्हे, अक्षय बबनलाल भळगट, आकाश राजेंद्र भळगट, आकाश कारभारी डफाळ यांच्या आस्थापनांवर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने कारवाई केली. त्यांना साडेनऊ हजार रुपयांचा दंड केला. आज सोमवारी दिवसभर पोलिस गाव, बसस्थानक व मुख्य पेठेत गस्त घालत होते.
कारवाई चालूच राहील
सोनईत कोरोना संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शासन नियमांचे उल्लंघन केले जात आहे. रुग्णवाढीची गंभीरता लक्षात घेवून नियम तोडत असलेल्या व्यावसायिकांवर धडक कारवाई केली जाईल. रस्त्यावर विनाकारण फिरणा-यांवर ठोस कारवाई करणार आहे.
- रामचंद्र कर्पे, सहायक पोलिस निरीक्षक
(Police take action against ten shopkeepers in Sonai)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.