ग्रामपंचायत सदस्यांची पळवापळवी रोखणाऱ्या पोलिसांनाच बदडले

आनंद गायकवाड
Saturday, 13 February 2021

वरवंडीच्या सरपंच-उपसरपंच निवडीवेळी दोन गटांत उमेदवारांच्या पळवापळवीमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ही माहिती मिळताच उपनिरीक्षक नयन पाटील व कर्मचारी घटनास्थळी पोचले.

संगमनेर ःतालुक्‍यातील वरवंडीच्या सरपंच-उपसरपंच निवडणुकीवेळी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की झाली.

या बाबत पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, 11 जणांना अटक करण्यात आली आहे. 

वरवंडीच्या सरपंच-उपसरपंच निवडीवेळी दोन गटांत उमेदवारांच्या पळवापळवीमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ही माहिती मिळताच उपनिरीक्षक नयन पाटील व कर्मचारी घटनास्थळी पोचले.

हेही वाचा - दादा म्हणाले, तुमचे धोतरच फेडतो, भाजप नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर

अशोक गागरे व राजाबापू वर्पे यांनी चिथावणीखोर भाष्य करून, जमावाच्या मदतीने पोलिसांना दमदाटी व धक्‍काबुक्‍की केली. याप्रकरणी अशोक गागरे, राजाबापू वर्पे, संपत भोसले, सुभाष गागरे, बाबासाहेब हारदे, किरण उगले, अनिल उगले, विलास वर्पे, सोमनाथ गागरे, शिवाजी गागरे, बाळासाहेब बकुळे, राहुल गागरे, इंदूबाई वर्पे (सर्व रा. वरवंडी, ता. संगमनेर), अशा 13 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

यांपैकी 11 जणांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police were beaten up in Sangamner taluka