
श्रीगोंदे : तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक नेते असल्याने पक्षात मोठी दाटी झाली आहे, तरीही श्रीगोंदेत झालेल्या बैठकीला बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे नेत्यांची गर्दी अन् कार्यकर्त्यांची उणीव अशीच राष्ट्रवादीची स्थिती दिसून आली. शिवाय, मनोमिलन बैठकीतच नव्या-जुन्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचेही पहायला मिळाले.