
शिर्डी : लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही मातब्बर नेत्यांनी राजकीय नुकसानीची किंमत मोजली. त्यानंतर हा संघर्ष काहीसा थंडावला.