
-मार्तंड बुचुडे
पारनेर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचे ठरले, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजप यांच्यातच खरी लढत होणार आहे. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालातून तालुक्यावर खासदार नीलेश लंके की, आमदार काशिनाथ दाते यापैकी कोणाचे राजकीय वर्चस्व आहे, याचे उत्तर मिळणार आहे. त्यामुळे ही लढत लंके व दाते यांच्या वर्चस्वाची ठरणार आहे.