राजकारणात हार- जित सुरूच असते, विकासकामे महत्त्वाची

सनी सोनावळे
Saturday, 25 July 2020

राजकारणात हार-जित सुरूच असते. पदे येतात, जातातही; परंतु विकासकामे करत राहणे तालुक्‍याच्या विकासाच्या दृष्टिकोन महत्त्वाचे आहे.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : राजकारणात हार-जित सुरूच असते. पदे येतात, जातातही; परंतु विकासकामे करत राहणे तालुक्‍याच्या विकासाच्या दृष्टिकोन महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषदेच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी माझा प्रयत्न राहील,'' असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम समिती सभापती काशिनाथ दाते यांनी केले. 

गारगुंडी (ता. पारनेर) येथील हनुमान मंदिर सभामंडपाचे उद्‌घाटन व अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन दाते व विजय औटी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सभापती गणेश शेळके, रामदास भोसले, आझाद ठुबे, राहुल शिंदे, श्रीकांत पठारे, विकास रोहकले उपस्थित होते. 

गारगुंडी फाटा ते चौंडी फाटा रस्ता, कासारे व निवडुंगेवाडीकडून गारगुंडीकडे येणाऱ्या उर्वरित रस्त्याकरिता निधी उपलब्ध करून देणार असल्याचे दाते यांनी सांगितले. सभापती गणेश शेळके यांनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकरिता स्वच्छतागृह, स्वयंपाकखोलीचे काम करून देण्यात येईल व मारुती मंदिरासमोर नागरिकांना बसण्यासाठी बाक देण्यात येईल, असे सांगितले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political statement during the ground breaking ceremony of Anganwadi building in Parner taluka